शितल कीर्तीकर या १४ वर्षीय मुलीचा डेंग्यूने म्रुत्यु झाल्याच्या ४ थ्या दिवशी देखील घाटी प्रशासन असंवेदनशील!

Foto

औरंगाबाद- घाटी परिसरातील कर्मचारी निवासस्थान बी विंग जवळील अस्वच्छतेमुळे डेंग्यूने १४ वर्षीय शितल कीर्तीकरचा म्रुत्यु होऊन ४ दिवस झाले तरीही घाटी प्रशासन असंवेदनशील आहे, असा आरोप आयटक आणि आॅल इंडिया युथ फेडरेशन ने केला आहे.

 

घाटी रुगणालय परिसरात असलेल्या मेडिसिन विभागा सामोरील  बी-विंगमधील शासकीय निवासस्थान परिसरात  अनेक वर्षापासून ड्रेनुज लाईन फुटलेली आहे. त्यामुळे  मैला परिसरात  पसरलेला आहे, त्या  ठिकाणी  कचरा साचलेला आहेघंटा गाडी येत नाही, इमारतीच्या भिंतीवर झाडे उगवलेले आहेत.  येथील इमारती मध्ये साप निघतात, प्रचंड अस्वच्छता आहे. प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे स्वच्छता न ठेवल्याने तिचा मृत्यू झाला. यास सर्वस्वी घाटी प्रशासन जबाबदार आहे. तसेच २० वर्षीय विजय सुरडकर हा कंत्राटी कर्मचारी नुकताच डेंग्यु आजारातून बरा झाला आहे. शीतलच्या मृत्यूनंतरही ४ दिवस होऊनही घाटी प्रशासनाला जाग आलेली नाही.  आयटक व ल इंडिया युथ फेडरेशन तर्फे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांना निवेदन देण्यात आले.

 

या आहेत निवेदनातील मागण्या

 

१)शीतल साईनाथ किर्तीकर (१४) वर्षे हिचा मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे नाकर्तेपणामुळे झाला आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून शीतलच्या बहिणीला शासकीय नोकरी द्यावी व कुटुंबाला १० लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी.

 

२) घाटी परिसरातील बी विंग परिसरातील कचरा तत्काळ उचलून त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरन करण्यात यावे, व नागरिकांचे प्राण वाचवावे.

 

) सध्या आहे त्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करुन नविन ड्रेनेज लाईनचे कामही करण्यात यावे.

 

) नळाचे पाईप तुटल्याने पाणी वाया जाते आहे त्यामुळे ते तत्काळ जोडण्यात यावे.

 

) इमारतीच्या भिंतींवर उगवलेले झाडे इमारतीसाठी धोकादायक असल्याने ती तत्काळ तोडण्यात यावी, इमारतीमध्ये झालेली बिळे बुजवून सापांच्या मुक्त संचारास पायबंद घालावा व होणारी प्राणहानी वाचवावी. अशा मागण्या आहेत.

 

निवेदनावर ॲड.  कॉ. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, सिध्दार्थ मोगली, सुनिल खरात, सिमा दाभाडे, शबाना शेख वसीम, कल्पना सुरडकर, विजया गायकवाड, दिपा कागडा, शोभा जाधव, गयाबाई सुरडकर, यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.